
वास्तवाला भिडणार्या ‘वायर’च्या पत्रकार
नीतीन ब्रह्मे
१३ मार्च २०२२
या वर्षी १ जानेवारी २०२२ला सगळे जग नवीन वर्षाचे स्वागत करत असताना; ‘बुली बाई’ नावाच्या वेबसाईटवर भारतातील मुस्लीम महिलांचा लिलाव करण्यासाठी बोली लावली जात होती. सोशल मीडियावर असलेले मुस्लीम महिलांचे फोटो त्यासाठी अपलोड करण्यात आले होते. इस्मत आरा या मुलीचा फोटो त्या दिवशी ‘डिल ऑफ द डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. इस्मत आरा ही ‘द वायर’ची पत्रकार आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी रोहिणी सिंगला सोशल …